esakal | बापरे...कमोडमध्ये चक्क सापडला नाग, मग पुढे असे घडले...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी शहरातील भाग्यलक्ष्मीनगरमधील घटना, भाग्यलक्ष्मीनगरातील एका घरात असलेल्या कमोड मध्ये चक्क नाग सापडल्याची धक्कादायक घटना शनिवारी, ता. १ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.

बापरे...कमोडमध्ये चक्क सापडला नाग, मग पुढे असे घडले...

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या दिवसात अडचणीच्या जागा, खाटपसारा असलेली खोली किंवा वाढलेले गवत यापासून जवळ असलेल्या परिसरात साप निघण्याचा धोका जास्त असतो. परभणी शहरातील वसमत रस्त्यावर असलेल्या भाग्यलक्ष्मीनगरातील एका घरात असलेल्या कमोड मध्ये चक्क नाग सापडल्याची धक्कादायक घटना शनिवारी, ता. १ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. विशेष म्हणजे हा नाग रात्री सुध्दा त्याच जागेवर घरातील सदस्यांना दिसला होता. त्यानंतर घरातील सदस्यांनी कमोडचाही वापर केला होता.

परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील भाग्यलक्ष्मी नगरातील रहीवाशी बबनराव रेखावार यांच्या घरातील कमोडच्या भांड्यात नाग जातीचा विषारी साप आढळून आला. परंतू सर्पमित्र रणजित कारेगांवकर यांनी या नागाला पकडून परिवाराला भयमुक्त केले.

सर्पमित्र सौरभ पवार यांना मोबाईल फोन वरून कळवले

शनिवारी (ता.१) पहाटे 3 वाजता इंदुमती रेखावार यांना घरातील बाथरूमजवळ ठेवलेल्या गॅस टाकीच्या मागे काहीतरी वळवळताना दिसले. त्यांनी पती बबनराव रेखावार यांना झोपेतून जागे करून ही बाब कळवली. तो साप असल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजारी असलेले शंकरराव बेद्रे व अजिंक्य बेंद्रे यांना ही झोपेतून जागे केले. श्री.बेद्रे यांनी सर्पमित्र सौरभ पवार यांना मोबाईल फोन वरून कळवले. सौरभ पवार हे त्या ठिकाणी त्वरीत आले. बरीच शोधाशोध केली पण तो साप सापडला नाही. मग सकाळी सातच्या सुमारास श्री. रेखावार यांचा नातू प्रणव रेखावार यास तो साप कमोड संडास भांड्यात दिसला. लगेच त्यांनी सर्पमित्र रणजित कारेगांवकर यांना बोलावले.

हेही वाचा या कारणासाठी सख्या भावानेच भावाला टाकले संपवूवन

शेवटी त्या नागाला पकडले.

तो नाग जातीचा अत्यंत विषारी साप असल्याचे श्री. कारेगावकर यांनी सांगितले. गॅस टाकीजवळून तो पहाटे कमोड संडास भांड्यात लपला होता. आणि म्हणून श्री. पवार यांना तो सापडला नाही. भांड्यातले बाहेर काढलेलेले तोंड पकडायला गेले की तो साप पटकन आत घ्यायचा. रणजित कारेगांवकर यांनी दोन अडीच तास अथक प्रयत्न केले. बाहेरचे चेंबरही फोडले. भरपूर पाणी टाकले. आत काठी, गज व ब्रश सोडून अर्धा तास तो बाहेर येईल याची वाट पाहीली पण तो बाहेर आलाच नाही. शेवटी तो पाईपलाईनमधून बाहेर गेला असे समजून रणजित कारेगांवकर सकाळी 10:30 वा घरी गेले. दरम्यान श्री. रेखावार परिवारानेही भांड्याचा वापर केला. तो काही बाहेर आला नाही. परंतु दुपारी दोन वाजता पुन्हा इंदुमती रेखावार यांना तो साप भांड्यात बाहेर तोंड काढून बसल्याचे दिसले. त्यांनी सर्पमित्र श्री. कारेगांवकर यांना फोन केला. त्वरित ते तिथे पोहचले व त्या नागाला पकडले.

साप थकला होता.

रात्री पेक्षा साप बराच थकलेला होता. त्यामुळे त्याला अधिकची चपळता दिसून आली नाही. त्याला बाहेर काढून रेखावार परिवाराला त्यांना भयमुक्त केले व लागलीच निर्जनस्थळी निसर्गाचा सान्निध्यात सोडूनही दिले. याप्रसंगी अजिंक्य बेंद्रे, गजानन काळे, दीपक घाटुळ, प्रज्वल रेखावार, धम्मपाल कांबळे यानी सहकार्य केले. रेखावार परिवारानेही सर्पमित्रांचे खुप आभार मानले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image