गेवराई - घरामध्ये, मी एकाटा कर्ता पुरुष आहे. अडीच एक्कर कोरडवाहू शेती असून, तीन मुले आहेत. त्यांचे शिक्षण, घर प्रपंच सांभाळून काम करत आहोत. पण, गणित जुळत काही नाही. डोक्यावर कर्ज आहे. त्यातच, आजाराने त्रस्त झालो. मी, हतबल झालोय. त्यामुळे, जगाचा निरोप घेतोय. अशी चिठ्ठी लिहून बीडमधील गेवराईच्या शेतक-याने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतल्याची घटना आज पहाटे घडली.