
औरंगाबाद : आबालवृद्धांच्या अतिशय आवडत्या आईस्क्रीममध्ये वनस्पती तूप, सॅकरिन आणि चक्क धुण्याचा सोडादेखील मिसळला जातो, हे तुम्हाला माहिती आहे काय? आपण जे आईस्क्रीम खातो, ते किती चांगले आहे आणि किती विषारी आहे, ते आपल्यालाही समजत नाही. त्यामुळे आईस्क्रीम खाताना जागरूक राहिले पाहिजे.
औरंगाबाद : आबालवृद्धांच्या अतिशय आवडत्या आईस्क्रीममध्ये वनस्पती तूप, सॅकरिन आणि चक्क धुण्याचा सोडादेखील मिसळला जातो, हे तुम्हाला माहिती आहे काय? आपण जे आईस्क्रीम खातो, ते किती चांगले आहे आणि किती विषारी आहे, ते आपल्यालाही समजत नाही. त्यामुळे आईस्क्रीम खाताना जागरूक राहिले पाहिजे.
उन्हाळ्यात तर सगळे आईस्क्रीमवर तुटून पडतातच; पण हल्ली वर्षभर चालणारी कित्येक आईस्क्रीम पार्लर्स शहरात उघडली आहेत. मोठ्या कंपन्यांबरोबरच शहरात छोट्या-छोट्या कारखान्यांतूनही विविध प्रकारचे आणि कित्येक फ्लेवर्सचे आईस्क्रीम बाजारात आलेले दिसते. काही दिवसांपूर्वी मुंबईत माटुंगा आणि वडाळा येथे भेसळयुक्त तेलाच्या आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य अन्न व औषध विभागाने धाड टाकली होती. त्यात स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मिडियम फॅट, व्हॅनिला आईस्क्रीम मिडियम फॅटचे नमुने आणि भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले होते.
दुधाच्या मलईपेक्षा वनस्पती तूप स्वस्त आहे आणि मलईपासून बनवलेले आईस्क्रीम्स सर्वसाधारण तापमानात जास्त काळ राहू शकत नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या अनेक भागांत काही बोगस कंपन्यांनी दुधाऐवजी वनस्पती तूप मिसळलेल्या आईस्क्रीमचा पुरवठा केल्याचे गेल्या वर्षी समोर आले होते. खरे आईस्क्रीम आणि वनस्पती तूप मिक्स केलेले आईस्क्रीम यांच्यात फारसा फरक ओळखता येत नसल्याने ग्राहक या आईस्क्रीमला बळी पडतात. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे डॉक्टर्स सांगतात.
थंडगार आईस्क्रीम खाताना आपल्याला त्यातल्या भेसळीची चव चटकन कळणे शक्य नसते. पण वेगवेगळे फ्लेवर्स आणि काही खाद्यपदार्थांचा वापर या बनावट आईस्क्रीममध्ये केला जातो. त्या फ्लेवर्समुळेही मलईमिक्स आहे, की वनस्पती तूपमिक्स हे सहज कळत नाही. चवदार आईस्क्रीम खाण्याच्या नादात आपण डालडा खात आहोत, हे मोठ्यांनाही कळत नाही, तर लहान मुलांना कसे कळणार?
जास्त दिवस टिकण्यासाठीच भेसळ
कशी ओळखणार भेसळ?