नियमांचे उल्लंघन असल्यास रुग्णालयावर कारवाई, वैद्यकीय मंत्र्यांची माहिती

हरि तुगावकर
Tuesday, 19 May 2020

लातूर येथील एका रहिवासी ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असताना त्याच्यावर कोरोनाबाबतचे कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. त्याला तसेच लातूरला पाठवून देण्यात आले. या प्रकाराची चौकशी करण्यात येईल; तसेच नियमांचे उल्लंघन झाले असल्यास ठाणे महापालिकेच्या रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी येथे दिली.

लातूर ः येथील एका रहिवासी ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असताना त्याच्यावर कोरोनाबाबतचे कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. त्याला तसेच लातूरला पाठवून देण्यात आले. या प्रकाराची चौकशी करण्यात येईल; तसेच नियमांचे उल्लंघन झाले असल्यास ठाणे महापालिकेच्या रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी येथे दिली.

येथील एक रहिवासी असलेला व्यक्ती ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. काही दिवस त्याने तेथे उपचारही घेतले; पण तेथे त्याच्यावर कोरोना कोविड १९ च्या संदर्भात कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. त्याच्या विनंतीनंतर त्याला सोडून देण्यात आले. ही व्यक्ती रुग्णवाहिका करून सरळ लातूरला आली. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ती उपचारासाठी दाखल झाली. त्याची येथे कोरोनाची चाचणी करण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती.

हाफकिनच्या सहकार्याने लसीचे संशोधन, मंत्री अमित देशमुख

ही व्यक्ती ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असताना तेथे त्याची कोरोनाची तपासणी झाली नसल्याचे येथे आल्यानंतर उघड झाले होते. त्या रुग्णालयाचा हलगर्जीपणाही समोर आला होता. यासंदर्भात `सकाळ`ने मंगळवारी (ता.१९) `ठाणे महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा लातूरकरांना नडला` असे वृत्त प्रकाशित झाले होते. या रुग्णाची सर्व माहिती घेण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच कोरोनासंदर्भात चाचणी झाली होती का? यात नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याचीही चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Fault Found Action Will Take Against Thane Civil Hospital