esakal | मांजराचे दरवाजे बंद तर निम्न दुधनातुन विसर्ग सुरू । Manjra Dam
sakal

बोलून बातमी शोधा

मांजरा धरण

मांजराचे दरवाजे बंद तर निम्न दुधनातुन विसर्ग सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्याच्या मोठ्या धरणांपैकी येलदरी, निम्न दुधना, मांजरा, मानार, निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. गुरूवारी ( ता. ३० ) निम्न दुधना वगळता सर्वच धरणातुन विसर्ग सुरू होता मात्र शुक्रवारपासून निम्न दुधनातुनही विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच मांजरा धरणातील विसर्ग बंद करण्यात आला तर सीना कोळेगाव धरण वगळता उर्वरीत सात धरणातुन विसर्गचे प्रमाण कमी करण्यात आले.

हेही वाचा: सातारा: आयडीबीआय बँकेस साडेचार लाखांचा गंडा; एकावर गुन्‍हा

जायकवाडी धरणात शुक्रवार (ता. एक) पर्यंत २१५३.०२ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असून हे प्रमाण ९९.१७ टक्के इतके आहे. येलदरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा , सीना कोळेगाव आणि मनार ही धरणे १०० टक्के भरली आहेत. यामध्ये येलदरीत २४२.२० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा, सिद्धेश्‍वरमध्ये ७७.५३ दशलक्ष घनमीटर, मानारमध्ये १३८.२१ दशलक्ष घनमीटर आणि विष्णुपुरीत ५१ . ४७ दशलक्ष घनमीटर, निम्न दुधनामध्ये २४२.२० दशलक्ष घनमीटर, माजलगाव धरणात ३०७.२० दशलक्ष घनमीटर, मांजरा धरणात १७६.९६ दशलक्ष घनमीटर, पेनगंगा धरणात ९६०.२७ दशलक्ष घनमीटर, निम्न तेरणात ९१.२२ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा, सीना कोळेगाव धरणात ८९.३५ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त साठा सध्या आहे. निम्न दुधना वगळता सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मोठ्या धरणातील साठा (टक्केवारी)

धरणाचे नाव ........टक्केवारी ...........विसर्ग सुरू (क्युसेक्स)

जायकवाडी : ........९९.१७ .........५७६३८

निम्न दुधना : .......१०० ...............६५६४

येलदरी : ..........१०० ...........४२१९

सिद्धेश्‍वर :..........९५.७६ ............२९१२

माजलगाव : .......९८.४६ ............९९८७

मांजरा : ............१०० .............०००

पेनगंगा : ..........९९.६१ ............११९५७

मानार : ...........१०० .............६६६

निम्न तेरणा : .....१०० ............१५३३

विष्णुपुरी : ........५४.२० ............१७३७४८

सीना कोळेगाव : ...१००..............६३३५

loading image
go to top