esakal | रेमडेसिव्हर, बेड मिळत नसतील तर निसंकोच फोन करा- खासदार हेमंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकारांशी साधला संवाद, नागरिकांना कोरोना त्रिसुत्री नियम पाळण्याचे आवाहन.

रेमडेसिव्हर, बेड मिळत नसतील तर निसंकोच फोन करा- खासदार हेमंत पाटील

sakal_logo
By
संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट ठसलेले गिरगाव व शहरासह तालुका भरात तोरणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आमदार राजू पाटील नवघरे सीईओ श्री शर्मा जिल्हा आरोग्य अधिकारी श्री पवार तहसीलदार अरविंद बोळंगे आदींच्या उपस्थितीमध्ये वसमत तहसील कार्यालयात प्रशासकीय आढावा बैठक घेण्यात आली. 

गिरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली तसेच रुग्णांना उपचार मिळावे यासाठीचे नियोजन करण्यात आले. यानंतर खासदार हेमंत पाटील शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू पाटील चापके यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की वसमत तालुक्यात नव्हे तर हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांना सरकारी व खाजगी रुग्णालयात बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर गिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

येत्या चार दिवसात वसमत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे ५० बेड ऑक्सीजन सहित कोविड सेंटर तयार होणार असून यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय थांबेल असे ते म्हणाले. रेमडेसिव्हिर, बेड मिळत नसल्यास रात्री. बेरात्री कधीही फोन करा मी मदतीसाठी तत्पर असेल असे आव्हान केले. परंतु नागरिकांनी साधी सर्दी ताप आहे असं समजून आजार अंगावर काढू नये अनेक जणांना  हा आजार साधेपणाने घेतल्यामुळे त्यांना तीनच दिवसात गंभीर आजाराला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे त्यामुळे कृपया करून नागरिकांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करावे तसेच तोंडाला मास्क, सोशल डिस्टंसिंग व सनिटायझर चा वापर करावा, विनाकारण गर्दी टाळावी असे आवाहनही खासदार हेमंत पाटील या यांनी नागरिकांना केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image