esakal | नांदेड परिक्षेत्राचे आयजी मनोज लोहिया रुजू
sakal

बोलून बातमी शोधा

ig.jpg

मुंबई येथे कार्यरत असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी काल पदभार स्वीकारला आहे. 

नांदेड परिक्षेत्राचे आयजी मनोज लोहिया रुजू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मुंबई येथे कार्यरत असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी काल पदभार स्वीकारला आहे. 

राज्याच्या गृह विभागाकडून गुरुवारी राज्यातील काही पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल आणि पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली होती.

मुंबई येथे कार्यरत असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी तर सोलापूर येथील उपायुक्त विजयकुमार मगर यांची पोलिस अधीक्षक नांदेड या पदावर बदली झाली. आज शुक्रवारी मुंबई येथून विमानाने मनोज लोहिया यांचे सायंकाळी सहा वाजता गुरु गोविंदसिंग विमानतळावर आगमन झाले. पोलिस उपाधीक्षक विजय जोंधळे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

त्यानंतर रात्री आठ वाजता विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा पदभार घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक संजय जाधव परभणीचे पोलिस अधीक्षक उपाध्याय, हिंगोलीचे योगेशकुमार आणि लातूरचे पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. रात्री उशिरा नूतन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांचेही नांदेडमध्ये आगमन झाल्याचे सांगण्यात आले. ते शनिवारी आपल्या पदाचा पदभार घेणार आहेत.

loading image
go to top