crime
sakal
मुरुड - येथील विविध अवैध व्यवसायांबाबत 'दैनिक सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच नांदेड पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने मुरुड पोलिसांसह तातडीने धडक कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या पोलिसांच्या एका नातेवाईकांच्या अड्ड्यासह व भर बाजारात चालणाऱ्या मटका , जुगार अड्ड्यावर छापे टाकले. यात जवळपास दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.