Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढेजळगाव शिवारात कपाशीच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचा प्रकार आला उघडकीस.
ganja seized in gadhejalgaon village

ganja seized in gadhejalgaon village

sakal

Updated on: 

- बाळासाहेब काळे

करमाड - छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढेजळगाव शिवारात कपाशीच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करमाड पोलिसांनी शुक्रवारी (ता. ९) सकाळी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करीत गांजाची लहान-मोठी ४३० झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन ७२ किलो ७८० ग्रॅम असून, त्यांची अंदाजित किंमत १८ लाख १९ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी शेतकरी श्रीराम रघुनाथ कोरडे (वय ५०, रा. गाढेजळगाव) याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com