

Gangapur Police Seize Vehicle During Illegal Cattle Transportation Four Accused Booked in the Case
esakal
-राजेंद्र व्यास
गंगापूर : गंगापूर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची निर्दयीपणे आणि विनापरवाना अवैध वाहतूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार (ता. १४) रोजी करण्यात आली असून, पोलिसांनी ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.