Illegal Cattle Transport : बीड शहरातील पशुधनाची वाहतूक; पाच जणांवर गुन्हा
Beed News : बीड शहरात टेंपोमधून गायींची बेकायदेशीर वाहतूक करताना गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पाच जणांना पकडले. १० जरसी गायी आणि २ वासरे निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जात होती; प्रकरणी गुन्हा दाखल.
बीड : शहरातील बार्शी रोडवरील एका लॉन्सजवळ टेंपो (एमएच १७ सीव्ही ७६६४) मधून गायींची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने वाहतूक उधळून लावत पाच आरोपींना ताब्यात दिले.