
धनंजय शेटे
भूम : जनावरांची तस्करी गोरक्षकांच्या मदतीने (ता १३ ) रोजी सकाळी भूम - पार्डी रोडवर करण्यात आली .अवैद्य कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भूम शहरात मानद पशू कल्याण अधिकारी विराज आनंद सोले (वय २५ रा . संतोष नगर ,कात्रज पुणे ) , व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्डी रोडवरील श्रावणी हॉटेल जवळ जनावरांची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पकडली .त्यांनी ही माहिती तात्काळ भूम पोलिसांना दिली .पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करत दोन्ही वाहने ताब्यात घेतली.