Illegal Gutkha and Tobacco Stock Worth ₹59 Lakh Seized in Kalamb
sakal
कळंब - जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कळंब पोलिसांनी मोठी कारवाई करत डिकसळ येथील प्रभाकर भैरू चौधरी यांच्या घरात साठवून ठेवलेला तब्बल ५९ लाख २३ हजार १२८ रुपयांचा अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.