
देगलूर : राज्य शासनाने गुटका व पान मसाल्यावर विक्री व वाहतूक करण्यास बंदी घातलेली असतानाही सोमवार ता.३० रोजी रात्री तालुक्यातील वझरगा रोडवर एक स्विफ्ट डिझायर मधून ३ लाख २० हजाराचा गुटखा वाहतूक करताना आढळून आल्याने कार व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.