Illegal Liquor Factory Busted in Farm Shed State Excise Department Raids Yellori
sakal
औसा - गावाच्या शिवारातील शेतात पत्र्याचे शेड उभारून त्यात बनावट मद्यनिर्मितीचा कारखानाच सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार येल्लोरी येथे उघडकीस आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत २ हजार ५०० लिटर स्पिरिट, मद्य बाटलीबंद करण्याची मशीन, फ्लेवरिंग एजंट, रिकाम्या काचेच्या बाटल्यांसह एकूण ५ लाख २३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.