पाचोड - सर्रासपणे प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षित व अनधिकृत उत्पन्नामुळे चोरटया वाळु, दगड व मुरुमाच्या उत्खननामुळे शासनाचा कोट्यावधीचा रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र पाचोडसह पैठण तालुक्यात पाहवयास मिळते..गेल्या अनेक वर्षापासून पैठण तालुक्यातील आडगाव जावळे, मुरमा, कोळीबोडखा, वडजी, कडेठाण,खंडाळा, थेरगाव, दाभरूळ, चितेगाव, बिडकीन शिवारात अनधिकृतरित्या बेसुमार दगड, मुरूम व वाळू आदी गौण खनिजांचे बेसुमार उत्खनन करण्यात येत असून गोदावरीतील वाळु पट्टयासह खदानीतून होणाऱ्या गौण खनिजाची बिनदिक्कतपणे सर्रास इच्छितस्थळी वाहतुक केली जात आहे..अनधिकृत गौण खनिजाच्या धावणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यातील एकंदर सर्व रस्त्याला अवकळा प्राप्त झाली आहे. पैठण तालुक्यातील सर्व रस्ते व बांधकामाला लागणारे दगड, वाळू आडगाव जावळे, मुरमा, कोळी बोडखा, खंडाळा, चितेगाव व बिडकीन भागातून पुरवले जाते.तर पैठण तालुक्यासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यात लागणाऱ्या सर्व खासगी व शासकीय कामांना लागणारी वाळु राजरोजपणे हिरडपूरी, घेवरी, टाकळीअंबड, आपेगाव वाळू पट्ट्यातून उपसा करून पोलिस व महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून विक्रीसाठी पाठवली जाते.एकंदरीत वाळुतस्करानी गोदावरी पोखरल्याने पैठण तालुक्यात भिषण पाणीटंचाई निर्माण होऊन तालुक्याची राजस्थानच्या वाळवंटाकडे वाटचाल सुरू झाली आहे..तालुक्यात अनेक स्टोन क्रेशर असून खदानी चालक राजरोसपणे खदाननीतून दगडांचे बेसुमार उत्खनन करून ट्रॅक्टर व ट्रकद्वारे इच्छित स्थळापर्यंत वाहतूक करतात. खदानीतून करण्यात येणाऱ्या गौण खनिजाच्या उत्खननासंबंधी सर्वाधिकार महसुल विभागास असून महसुल विभाग व पोलिस प्रशासन आपणांस मिळणाऱ्या अनधिकृत उत्पन्नापुढे शासनाच्या महसुलाला मूठमाती देतअसल्याची चर्चा परिसरात आहे..एकंदरीत पाचोड परिसरात शंभरावर अनधिकृत खदानी अस्तित्वात असून काही खदानीचे बेसुमार उत्खनन करण्यात आल्याने त्यास पाणी लागल्याचे चित्र पाहवयास मिळते. तलाठी व मंडळ अधिकारी, कर्मचारी सेवेच्या ठिकाणी कधीच नियमित हजर राहत नसले तरी रविवारी मात्र खदानी चालकांकडून वरकमाई गोळा करण्यासाठी पाचोडच्या आठवडे बाजारात आवर्जून हजेरी लावतात.आपणास मिळणाऱ्या अनधिकृत उत्पन्नापुढे त्यांना नमते घ्यावे लागत आहे..संबंधीतास महसूल उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात येत असल्याने वाळूमधून त्या उद्दिष्टाची उद्दिष्टपूर्ती करून स्वहित जोपासण्याचे काम महसूल व पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे अनधिकृत उत्पन्नात "वाटा न मिळणाऱ्या" नाराज कर्मचाऱ्यांकडून ऐकावया स मिळते.महसूल व पोलिस विभागाच्या केवळ स्वार्थवृत्तीमुळे शासनाचा किती महसूल बुडाला याचा हिशोब करणे कठीण आहे.काही वर्षांपूर्वी थेरगाव व बोडखा शिवारातील खदानीचे उत्खनन करतांना दरड कोसळून सहा व्यक्ती जागीच ठार झाल्या होत्या. त्याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यां च्या आदेशान्वये खदानी प्रशासनांना ताब्यात घेऊन सिल केल्या होत्या. काही दिवस उत्खनन थांबले व त्यानंतर नव्या जोमाने अहोरात्र गौण खनिजाचे अवैध सुरू झाले..आडगाव जावळे शिवारात तर डोंगर पोखरण्यासोबतच सरकारी गायरानात बेसुमार खदानीचे उत्खनन करण्यात येत आहे. संबंधीत उत्खनन करणाऱ्यावर प्रशासनाचे नियंत्रण न राहिल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे. अहोरात्र दगडाचे उत्खनन करून राजरोसपणे छत्रपती संभाजीनगर व पैठण तालुक्यात दगड व खडीची वाहतूक केली जाते.एवढेच नव्हे तर अहोरात्र खदानीचे उत्खनन करत असताना स्फोटके उडवावे लागत असल्याने परिसरातील अनेक गावांतील घरांना तडे जात असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. संबंधित खदानी चालकां कडून कोतवालापासून तहसीलदारापर्यंत सर्वच जण मस्तवाल असल्याचे सांगितले जाते..यावेळी तहसीलच्या गौण खनिज कक्ष प्रमुखाशी चर्चा केली असता त्यांनी सर्व खदानी बंद असल्याचे सांगितले. परंतु दररोज हजारो ट्रकस दगड व खडीची रस्ते, इमारतीच्या बांधकामासाठी राजरोसपणे वाहतुक केली जाते.स्टोन क्रेशरपासून राजरोस वाहतूक होत असल्याचे पाहूनही कुणी कारवाईसाठी धजावत नाही.तूर्तास थेरगाव,आडगाव जावळे, कोळी बोडखा मुरमा, बिडकीन , चितेगाव येथील खदानीची पाहणी केल्यास अहोरात्र जेसीबी व पोकलेन द्वारे दगडाचे उत्खनन करून राजरोस वाहतूक होत असल्याचे पहावयास मिळेल. एवढेच नव्हे तर संबंधित खदानीला भर उन्हाळ्यातही पाणी लागल्याने इंजिनद्वारे उपसा करीत असल्याचे दिसून येते..खदानीचे उत्खनन करण्यासाठी बेकायदेशीररित्या स्फोटके बाळगणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस परिसरात वाढत असून स्थानिक पोलिसांसह महसूल विभागाला मिळणाऱ्या अनधिकृत मलिद्यामुळे कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. खदान चालकांसह आवाज घेणारे ट्रॅक्टर चालक, दुकानदार बेकायदेशीर रित्या सार्वजनिक ठिकाणी स्फोटके ठेवून सर्वसामान्यांच्या जिवाशीच खेळत असल्याचे धनराज भुमरे व अनिस पटेल यांनी सांगितले.निलम बाफना (उपविभागिय अधिकारी, पैठण - फुलंबी) - पैठण तालुक्यात किती खदानीना परवाना आहे ,हे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याने सांगता येणार नाही. परंतु वाळू, मुरुम व अन्य अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी तहसिल स्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु संबंधीत लोकांचे नेटवर्क शासकीय यंत्रणेपेक्षा गतिमान असल्याने कारवाई अयशस्वी होते. यापूर्वी अवैध खदानींवर कारवाई करून त्या सिल करण्यात आल्या होत्या.'.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.