

माहूरमध्ये वाळू माफियांचा हैदोस! पैनगंगेचे पात्र 'पोकलेन'ने ओरबाडले; तहसीलदारांच्या 'गांधारी' भूमिकेवर संताप, नायगावसारखी कारवाई कधी?
Sakal
माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील सायफळ,तसेच लांजी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात आला असून संबंधित यंत्रणांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वाळू घाटांचे अधिकृत लिलाव पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात नियमांना हरताळ फासून यांत्रिक पद्धतीने दिवस रात्र उत्खनन सुरू असल्याचे वास्तव आहे.
माहूर: सायफळ पैनगंगा घाटात यांत्रिकी ट्रेझर बोटि आणि पोखलेन मशीन द्वारे बेकायदेशीर वाळू उत्खनन केली जात आहे त्याचे जीपीएस लोकेशन प्रणाली मधील छायाचित्र.