Jalna: ग्रामस्थांनी रोखले वाळूचे चार हायवा; अवैध उपसा रोखण्याची मागणी, शहागड -पैठण रस्त्यावर तणाव

Villagers Stop Hyva Trucks Alleging Illegal Sand Mining: अंबड तालुक्यात साष्टपिंपळगाव-2 वाळू घाटातून अवैध वाळू उपसा होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शहागड-पैठण रस्त्यावर चार हायवा अडवले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
Jalna

Jalna

esakal

Updated on

अंकुशनगर: अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव- २ वाळू घाटातून वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २६) शहागड -पैठण रस्त्यावर चार तास अनेक हायवा अडवून धरले. ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या हायवांचे तत्काळ मोजमाप करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी कॉल करून महसूल आणि पोलिस प्रशासनालाही केली. मात्र, कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर वाळूमाफियांनी दमदाटी करून आपली वाहने पळवून नेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com