

देगलूर : शासनाच्या महसुलावर पाणी फेरण्याचे काम तालुक्यातील वाळूमाफियाकडून सुरूच असून रात्रीच्या वेळी रेती व मुरुमांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. महसूल व पोलिसांच्या पथकाकडून महिन्याभरात एखादी कार्यवाही करण्याचा देखावा केला जात असला तरी नदीपात्राला व माळरानाला वाळवंट करण्याचे काम काही करता थांबायला तयार नाही.