
नायगाव : तालुक्यातील राहेर येथील गोदापात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती सोमवारी (ता. सहा) तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्री उशिरा गोदापात्रातून वाळू उपसा करणारे साहित्य जप्त केले. मात्र, माफिया वाळू उपसा करणारी बोट पळविण्यात यशस्वी झाले.