Illegal Sand Mining Paithan Police Seize Five Hyva Trucks in Crackdown
sakal
पैठण - गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूची चोरी करून वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच हायवा वाहनांवर पैठण पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी (ता. २७) मध्यरात्री तुळजापूर शिवारात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पाच हायवा वाहनांसह वाळू असा एकूण एक कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.