
पारध : अवैध वाळूचा वाहतूक करणाऱ्या हायवाने समोरून येणाऱ्या पिकअप गाडीला जोराची धडक दिल्यामुळे दोन महिला ठार झाल्या तर इतर महिलावर रुग्णालयात उपचार सुरु असून, हा अपघात बुधवारी (ता. 30) पिंपळगाव रेणुकाई -भोकरदन या रस्त्यावर रेलगाव फाटा येथे रात्री साडे दहा च्या सुमारास घडला. याप्रकरणी पारध पोलिसांनी गुरुवारी .(1) हायवा चालका विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.