
पाचोड : २०१५-१६ मध्ये राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रुती तब्बल दहा वर्षांनंतर पाचोड खुर्द (ता. पैठण) परिसरात दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाचे पाणी गल्हाटी नदीच्या खोलीकरणामुळे अडवले गेले असून, त्यामुळे नदीलगतच्या विहिरींनी बाळसे धरल्याचे चित्र आहे.