Kalamb Crime News : पोलिसांच्या वादात, फिर्यादीची फरफट; तांदूळ जप्त, चोरटे फरार

वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाला कंटाळून किंवा घटनांना सामोरे जाऊन आपली कैफियत पोलिस ठाण्यात मांडण्यासाठी फिर्यादी जातात.
in dispute with police the prosecutor rice seized thieves absconding
in dispute with police the prosecutor rice seized thieves abscondingSakal
Updated on

कळंब : वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाला कंटाळून किंवा घटनांना सामोरे जाऊन आपली कैफियत पोलिस ठाण्यात मांडण्यासाठी फिर्यादी जातात. मात्र, फिर्यादींना सध्या पोलिसांकडून सहकार्याची वागणूक दिली जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी आलेल्या फिर्यादींना आमची हद्द नाही, असे सांगून त्यांची फरपट केल्याची घटना तालुक्यातील येरमाळा येथे घडली.

येरमाळा व वाशी पोलीस ठाणे यांच्या हद्दीच्या वादात तांदूळ चोरी झालेल्या ट्रकवाल्याची चांगलीच दमछाक झाली तर गुन्हा दाखल होताच अगदी दहा मिनिटात चोरी गेलेला तांदूळ आरोपीविना पोलीस ठाण्यात आल्याने पोलीस आणि चोरांची मिलीभगत की पोलीस शिरजोर अशा चर्चेला उधाण आले आहे.

सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावरून बीडकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक के.ए.५६ १३७७ गाडीतून ताडपत्री फाडून एश्वर्या एग्रो प्रोसेसर प्रा. लि. कंपनीचा मिनी कोलम तांदळाचे ९६२ कट्टे घेऊन जात असताना वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मीपारधी पिढी ते बीड रोडवर चालत्या गाडीतून अज्ञात चोरट्यांनी ताडपत्री तोडून ३२ तांदळाचे कट्टे चोरल्याचा प्रकार सोमवार (ता.२०) रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

हा प्रकार चालकाला मागून येणाऱ्या वाहन चालकांनी सांगितल्यानतर लक्षात आला. त्याने जागा बघून गाडी उभी केली.महामार्गावर वाशी पोलीस ठाण्याची उभ्या असलेल्या पेट्रोलिंग पोलीसांना तांदूळ चोरी झाल्याची माहिती दिली.त्या चालकाला मदत करायची सोडून गस्तीला असलेल्या पोलिसांनी चालकाला आमच्या हद्दीत गुन्हा घडला नाही, तू येरमाळा पोलिस ठाण्यात जा असे सांगितले.

चालकाने गाडी सह येरमाळा पोलिस ठाणे गाठले असता,येरमाळा पोलिसांनी चालकाला गाडीत घालून घटना स्थळ गाठले तेव्हा हा प्रकार आमच्या हद्दीत नाही तर वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तिथे तक्रार द्या असे सांगून येरमाळा येथून गाडी घेऊन पहाटे तीन वाजता वाशीकडे पाठवले.

दोन्ही ठाण्याच्या हद्दीच्या वादात मंगळवार (ता.२२) रात्री घटना घडल्यापासून तब्बल २२ तासने येरमाळा पोलिसात ट्रक चालक मोहम्मद नबिसाहब मोहम्मद उस्मानसाहब भंगिवाले रा. होटगी. ता. हुमानाबाद जि. बिदर याच्या फिर्यादी वरुन ट्रक मधील तांदळाचे ३२ कट्टे एकूण ४२ हजार १७६ रुपये किमतीचा तांदूळ अज्ञात चोरट्याने चोरीस गेल्याचे फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तांदूळ जप्त,चोरटे फरार

ट्रक मधील चोरीस गेलेला तांदूळ गुन्हा नोंद करण्याच्या पूर्वी पोलिसांना मिळाला मात्र,एकही तांदूळ चोरटे पोलिसांना सापडले नाही या वरुन पोलिसांची कामगिरी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.अशी चर्चा येरमाळयात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com