esakal | जालन्यात १७ रूग्णांवर कोरोनाची झडप

बोलून बातमी शोधा

corona

जालन्यात १७ रूग्णांवर कोरोनाची झडप

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यू सुरूच असून बुधवारी (ता.२१) तब्बल १७ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे ७९६ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान ८७१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात सात हजार १०० सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येसह कोरोना मृत्यूची संख्ये मागील काही महिन्यांपासून वाढ होत असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता.२१) शासकीय रूग्णालयात पाच तर खासगी रूग्णालयात १२ असे एकूण तब्बल १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ६४७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर दुसरीकडे बुधवारी (ता.२१) तीन हजार २९३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल ७९६ नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे तब्बल दोन हजार ६७१ कोरोना चाचण्या प्रलंबित आहेत.

दरम्यान नव्याने आढळून आलेल्या ७९६ कोरोना रूग्णांपैकी तब्बल २०५ रूग्ण हे एकट्या जालना शहरातील आहेत. तर जालना तालुक्यातील ८२, मंठा शहरातील तीन तालुक्यातील १८, परतूर शहरातील नऊ तालुक्यातील ३२, घनसावंगी शहरातील ४६ तालुक्यातील १११, अंबड शहरातील आठ तालुक्यातील ६८, बदनापूर शहरातील आठ तालुक्यातील ४१, जाफराबद शहरातील आठ तालुक्यातील २४, भोकरदन शहरातील दहा तालुक्यातील ८३ तर इतर जिल्ह्यातील ३७ नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३९ हजार ६५० कोरोनाबाधित आढऴून आले आहेत.

दरम्यान डॉक्टरांच्या अथक परिश्रणानंतर बुधवारी ८७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३१ हजार ९०३ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात सात हजार १०० सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.