esakal | जिंतूरमध्ये भुईमुगाचे क्षेत्र २७० हेक्टर अन् लागवड ३, २६४ हेक्टर क्षेत्रावर

बोलून बातमी शोधा

भुईमुग लागवड
जिंतूरमध्ये भुईमुगाचे क्षेत्र २७० हेक्टर अन् लागवड ३, २६४ हेक्टर क्षेत्रावर
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यात भुईमूग पिकाच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली. त्यामुळे

तालुक्याचे भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र २७० असताना प्रत्यक्षात ३, २६४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. याची टक्केवारी १, २०८ टक्के एवढी असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे व मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. यू. एन. आळसे यांनी तालुक्यातील केहाळ येथील कृषी भूषण शेतकरी मधुकरराव घुगे यांनी लागवड केलेल्या वेगवेगळ्या उन्हाळी भुईमूग वाणांची नुकतीच भेट देऊन पहाणी केली. श्री. घुगे यांनी एकूण २१ एकर क्षेत्रावर टी. जी. ५१, टी. जी. ३७ ए, टी. एल. जी. ४५ या सुधारित वाणांची टोकण पद्धतीने लागवड केली असून ते मागील वीस वर्षापासून उन्हाळी भुईमूग बियाणांचे सातत्याने उत्पादन घेत आहेत. त्याचप्रमाणे जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी सतत करत असलेल्या प्रयोगाबाबत मधुकर घुगे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व शेतकरी यांना सविस्तर माहिती दिली. या कामी त्यांचे बंधू व कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी पद्माकरराव घुगे हे त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करत आहेत.

घुगे यांच्या या उत्पादन पद्धतीची परिसरातील व बाहेर जिल्यातील शेतकऱ्यांना मदत होत आहे. ते करत असलेल्या प्रयोगाबाबत कृषी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले व उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे, मंडळ अधिकारी किशोर शेळके, मंडळ कृषी अधिकारी कृष्णदेव थिटे, कृषी सहायक हरि तोरणे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे