corona
coronaEsakal

मराठवाडा हादरला...कोरोनाचे १६६ बळी, वाढले सात हजार ८०० कोरोनाबाधित

दिवसभरात सात हजार ८०० कोरोनाबाधित आढळले.
Summary

दिवसभरात सात हजार ८०० कोरोनाबाधित आढळले.

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे १६६ जणांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (ता. २२) झाली. त्यात लातूरमध्ये ३८, नांदेड २७, औरंगाबाद २४, बीड २१, उस्मानाबाद २१, परभणी १९, जालना १०, हिंगोलीतील सहा जणांचा समावेश आहे. दिवसभरात सात हजार ८०० कोरोनाबाधित आढळले.

जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी :

औरंगाबाद १४५८, लातूर १२६९, परभणी १२२०, बीड ११४५, नांदेड १०९९, उस्मानाबाद ७१९, जालना ५५१, हिंगोली ३३९.

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान 20 जणांचा मृत्यू झाला. त्यात वैजापूर येथील महिला (वय ८०), बीड बायपास, औरंगाबाद येथील महिला (७३), इंदिरानगर, गारखेडा येथील महिला (३१), मिटमिटा येथील पुरुष (९०), एन - १२, हडको येथील पुरुष (५६), पहाडसिंगपुरा येथील पुरुष (८१), एन -११, हडको येथील महिला (५१), शेखपूर, (ता. खुलताबाद) येथील पुरुष (३२), उल्कानगरी, औरंगाबाद येथील पुरुष (७९), कन्नड येथील महिला (६५), भीमनगर, भावसिंगपुरा येथील पुरुष (३४), पिसादेवी रोड, औरंगाबाद येथील पुरुष (६०), बेळगाव, (ता. वैजापूर) येथील पुरुष (६५), मयूर पार्क, हर्सूल येथील पुरुष (६९), कुंभेफळ, शेंद्रा येथील महिला (६८), गारखेडा येथील महिला (८५), मयूरपार्क, (ता. गंगापूर) येथील पुरुष (५८), कालिका माता मंदिर, औरंगाबाद येथील पुरुष (६८), जरांडी, (ता. सोयगाव) येथील पुरुष (४३), पिंपरी राजा (ता. औरंगाबाद) येथील महिलेचा (७१) समावेश आहे. गुरुदत्त नगर, औरंगाबाद येथील पुरुषाचा (६७) जिल्हा सामान्य रुग्णालयात तर बजाज नगर, औरंगाबाद येथील महिला (६०), गोळेगाव, (ता. सिल्लोड) येथील महिला (५०), एन-सात सिडको येथील पुरुषाचा (६५) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

वाढले तितके रुग्ण झाले बरे

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४५८ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णांची संख्या १ लाख १४,४९५ वर पोचली. सध्या १५ हजार २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी १ हजार ४३३ जणांना सुटी देण्यात आली. यात महापालिका क्षेत्रातील ७४० तर ग्रामीण भागातील ६९३ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ९७ हजार १९८ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आणखी २४ जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत दोन हजार २७५ जणांचा मृत्यू झाला.

कोरोना मीटर (औरंगाबाद)

आतापर्यंत बाधित १,१४,४९५

बरे झालेले रुग्ण ९७,१९८

उपचार घेणारे १५,०२२

आतापर्यंत मृत्यू २,२७५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com