esakal | वसमतमध्ये एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरीकांची गैरसोय; केंद्र वाढवा

बोलून बातमी शोधा

कोरोना तपासणी

वसमतमध्ये एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरीकांची गैरसोय; केंद्र वाढवा

sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : देशात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने सरकारने कोरोना लढा व लसीकरण करण्‍यावर लक्ष केंद्रीत केले असून त्‍याचाच एक भाग म्‍हणून वसमत उपजिल्‍हा रुग्‍णालयात लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु या ठिकाणी एकच लसीकरण केंद्र आहे व तेथेच कोव्‍हीड केअर सेंटर सुध्‍दा आहे. त्‍यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून इतर नागरीकांनाही कोरोना संक्रमण होण्‍याची शक्यता असल्याने शहरात लसीकरण केंद्र वाढवावे अशी मागणी वसमत शिवसेनेच्या वतीने तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे बुधवार (ता. २८) केली आहे.

ता. एक मेपासून राज्‍यात १८ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण सुरु होत आहे, हे लक्षात घेवून लसीकरण केंद्रावरील गर्दी नियंत्रीत करण्‍यासाठी तसेच लस देणे सुरु झाल्‍यानंतर लसीची मागणी वाढेल व लसीकरण केंद्रावर खुप मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे नागरीकांची गैरसोय होवू नये म्‍हणून शहरात १) नागरी प्राथमिक आरोग्‍य केंद्र शुक्रवार पेठ, २) जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, ३) महात्‍मा गांधी विद्यालय, ४) नगरपरिषदेची जुनी इमारत सत्‍यनारायण टॉकीज चौक, ५) बहिर्जी स्‍मारक विद्यालय, ६) सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व सिध्‍देश्‍वर विद्यालय बसस्‍टँडच्‍या पाठीमागे इत्यादी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु झाल्‍यास नागरीकांची गर्दीही होणार नाही व सोशल डिस्‍टसींगचे पालन करणे सोपे होईल त्‍या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्‍यात यावे तसेच यासाठी वसमत शिवसेनेना प्रशासनास लागेल ती मदत करण्‍यास तयार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - नांदेडकरांनो आरोग्य सांभाळा : वाढत्या तापमानात अशी घ्या काळजी...!

या निवेदनावर नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शिवसेना न. प. गटनेते दिपक पाटील हळवे, शिवसेना शहरप्रमुख काशिनाथ भोसले, नगरसेवक धनंजय गोरे, अभय जैन, पिंटु महाकाळे, तान्हाजी कदम, माजी शहरप्रमुख मनोज चव्हाण, नगरसेवक नविन चौकडा, आशिष पवार, पंकज अडसिरे, गजानन कलाल, नागेश बेंडके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे