esakal | लोहारा तालूक्यात कोरोनाबरोबर डेंग्यू, चिकणगुणियाची साथ 
sakal

बोलून बातमी शोधा

डेंग्यू.jpg

सध्या लोहारा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या अत्यंत कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असताना डेंग्यू, चिकणगुण्या आजाराने डोके वर काढले आहे. शहरात डेंग्यू, चिकनगुण्याचा प्रत्येकी एक तर डेंग्यू-चिकनगुण्या संमिश्र असलेला एक असे एकूण तीन रूग्ण आढळून आले आहेत.

लोहारा तालूक्यात कोरोनाबरोबर डेंग्यू, चिकणगुणियाची साथ 

sakal_logo
By
नीलकंठ कांबळे

लोहारा (जि.उस्मानाबाद) : सध्या लोहारा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या अत्यंत कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असताना डेंग्यू, चिकणगुण्या आजाराने डोके वर काढले आहे. शहरात डेंग्यू, चिकनगुण्याचा प्रत्येकी एक तर डेंग्यू-चिकनगुण्या संमिश्र असलेला एक असे एकूण तीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाबरोबरच आता डेंग्यू, चिकनगुण्या आजाराला रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मागील आठ महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा सामना नागरिक करीत आहेत. त्यामुळे कमालीचे धास्तावले आहेत. प्रारंभीच्या काळात लोहारा तालुक्यात कोरोना संसर्गाचा म्हणावा तसा फैलाव झाला नव्हता. त्यामुळे नागरिक निर्धास्त होते. मात्र जून महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत गेली. आतापर्यंत तालुक्यात एकूण ५७८ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. या पैकी ५३७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर यात २१ जणांचा बळी गेला आहे. सद्य स्थितीत २० बाधित रूग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने केलेले प्रयत्न, नागरिकांनी सजग राहात घेतलेली काळजी यामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. चार ते पाच दिवसाला एक रूग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील तणाव निवळत असतानाच डेंग्यू, चिकनगुण्या आजाराने डोके वर काढले आहे. परतीच्या पावसाने दीर्घ मुक्काम ठोकल्याने शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी साचलेले पाणी, कचरा यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी डेंग्यू, चिकनगुण्यासारखे आजार बळावत आहेत. तीव्र ताप येणे, अंग दुखी, मळमळ, उलटी होणे, अंगावर पुरळ येणे यासारखे प्रकार होत आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरासह ग्रामीण भागातील दवाखाण्यात रूग्णांची संख्या वढली आहे. शहरातील तीघा जणांची शनिवारी (ता. ३१) बीड येथील जिल्हास्तरीय प्रयोगशाळात तपासणी केली असता एकाचा डेंग्यू, एकाचा चिकनगुण्या, तर  एकाचा संमिश्र डेंग्यु-चिकनगुण्या असल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागातही या आजाराचा फैलाव होत असून काही जण सोलापूर, लातूर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाबरोबरच डेंग्यू, चिकनगुण्या या आजाराचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाला आता दोन्ही पातळीवर लढा द्यावा लागणार आहे. साथ रोग टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे सुरु करण्यात आला असून ज्या भांड्यांमध्ये (कंटेनर) डासअळी असेल त्यात अबेट टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करणे व वयक्तिक संरक्षणाचे उपाय अवलंबीने आवश्यक आहे. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावे, डासरोधक क्रीम, औषधे, कॉइल यांचा वापर करावा तसेच अंगभर कपडे परिधान करावे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्त ताप, डोक्याच्या पुढील भागात, डोळ्यांच्या मागील भागात वेदना, अंग दुखणे, मळमळ-उलटी, अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरीत दवाखान्यात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावे. 
डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिकारी, लोहारा 

(संपादन-प्रताप अवचार)