Jintur News : येलदरी धरणातील विसर्गात वाढ; विद्युत निर्मितीसह ११,१४० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू
येलदरी धरण पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले असून अलीकडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू आहे.
जिंतूर - तालुक्यातील येलदरी धरणाचे आज दुपारनंतर आणखी दोन दरवाजे अर्धा मिटर उघडण्यात आले असून त्यासह विद्युतनिर्मितीसह अकरा हजार १४० निसर्ग पूर्णानदीपात्रात सोडण्यात आला आहे.