
परभणी: परभणी जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या इंद्रायणी देवीचा माळ (डोंगर) या ठिकाणी सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढू लागली आहे. परभणी व मानवत तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेला हा माळ आता जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. इंद्रायणी देवीचे सुंदर मंदिर, निसर्गरम्य, शांत परिसर आणि वाढती पायाभूत सुविधा यामुळे येथील आकर्षण वाढले आहे.