

Hingoli
esakal
हिंगोली: शहरातील रिसाला नाका ते आदर्श महाविद्यालय आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने वाहनचालक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने आणि नागरिकांची वर्दळ असते. असे असतानाही संबंधित यंत्रणेकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.