
माहूर : रब्बी हंगामातील पिकांवर दिवसा पाखरं, तर रात्रीला रानडुक्करं, नीलगायच्या हैदोसाने मातीमोल होत असलेले रब्बीची पिके वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने देशी जुगाड शोधून काढले. रानडुकरे, नीलगाय पाखर पळवण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून अनोखा प्रयोग केला असून, कुठल्याही खर्चाशिवाय या प्रयोगातून शेत पिकाचे संरक्षण होत आहे.