esakal | अंकुरलेल्या कोवळ्या रोपांवर  अळीचा प्रादुर्भाव !
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

झालेल्या पावसामुळे जमिनीत थोडी ओली निर्माण झाल्याने व पुन्हा पाऊस पाडण्याच्या आशेवर शेतकऱ्यांनी मूग, कापूस, सोयाबीन, हळद या व इतर खरीप पिकांच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. यामध्ये पूर्णा, करपरा या नद्यांच्या किनारी भागात पेरण्याचे प्रमाण जास्त आहे. बियाणांची उगवणही चांगली झाली. परंतु, चार दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्याने अंकुरलेल्या कोवळ्या रोपांवर किडीचा प्रादुर्भाव पडला आहे.

अंकुरलेल्या कोवळ्या रोपांवर  अळीचा प्रादुर्भाव !

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जि.परभणी) : जिंतूर तालुक्यात कापसाचे पीक उगवते न उगवते तोच त्याच्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पंधरा दिवसांत केवळ नऊ टक्केच पर्जन्यमान झाले असून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
एक जूनपासून पावसाळा सुरू झाला. सुरवातीचे दोन दिवस मध्यम स्वरूपाचा बिगरमोसमी पाऊस पाडला. त्यानंतर अकरा ते सोळा जूनपर्यंत हलका मोसमी पाऊस झाला. तोदेखीद सर्वत्र सारखा पडला नाही. या अठरा दिवसांत आठ दिवस पावसाचे राहिले. यातील पाच दिवस दहा मिलिमीटर पेक्षा जास्त तर चार दिवस एक ते नऊ मिलिमीटर. याप्रमाणे १८ जूनपर्यंत केवळ ७६ मिलिमीटर पाऊस झाला. जो वार्षिक सरासरीच्या केवळ नऊ टक्के आहे. झालेल्या पावसामुळे जमिनीत थोडी ओली निर्माण झाल्याने व पुन्हा पाऊस पाडण्याच्या आशेवर शेतकऱ्यांनी मूग, कापूस, सोयाबीन, हळद या व इतर खरीप पिकांच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. यामध्ये पूर्णा, करपरा या नद्यांच्या किनारी भागात पेरण्याचे प्रमाण जास्त आहे. बियाणांची उगवणही चांगली झाली. परंतु, चार दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्याने अंकुरलेल्या कोवळ्या रोपांवर किडीचा प्रादुर्भाव पडला आहे.

हेही वाचा : ऑनलाइन शिक्षणात अडचणींचा सामना
 

अनेक गावे तहाणलेली
गतवर्षीचा अपुरा पाऊस त्यात या वर्षी चार महिन्यांपासून उन्हाच्या झळांनी तालुका होरपळून निघाला. विहिरींची पाणीपातळी खोल गेली. नद्या, ओढे, नाले, लघू प्रकल्प केंव्हाच कोरडे पडले. परिणामी हिवाळा संपण्यापूर्वीपासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईचने तोंड वर काढले. रानात चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांसाठी विविध उपयोजना अमलात आणल्या. त्यातील बहुतांश योजना कागदोपत्री राबविण्यात आल्याने सद्यःस्थितीही अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.किडीमुळे नुकसान 
सोयाबीन, तूर, कापूस पिकाची पेरणी केली असून पाचेगाव शिवारात ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाच्या भरवशावर पेरणी पेरलेले उगवत असताना पावसाने दडी मारली. कापसाची उगवलेली पाने आळी व किडीमुळे नुकसान करत आहेत. दमदार पावसाची गरज आहे.
- प्रभाकर निवृत्ती ससे, शेतकरी, पाचेगाव

हेही वाचा : अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड -

दमदार पावसाची गरज
सुरवातीला मृग नक्षत्रामध्ये झालेल्या पावसामुळे पाच बॅग सरकी बियाणांची लागवड केली आहे. परंतु, पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उगवलेली कोवळी रोपे कोमेजून जात आहेत व कोवळी पाने कीड व आळ्या फस्त करत आहेत. यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
- अशोक छापरे, युवा शेतकरी, पाचेगाव