

From Rampur to Yadgir: A Remarkable Journey of IAS Rahul Pandave
Sakal
देगलूर : जिद्द, सातत्य आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर देगलूर तालुक्यातील रामपूर येथील सुपुत्र राहुल तुकाराम पांडवे यांनी प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन करत कर्नाटक राज्यातील यादगीर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदापर्यंत मजल मारली आहे. नुकताच त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून देगलूर तालुक्यातून प्रथमच एखादी व्यक्ती जिल्हाधिकारी पदावर विराजमान झाल्याने संपूर्ण तालुक्यात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.