Inspiring Success Story : नोकरीची ‘प्रतीक्षा’ न करता व्यवसायात घेतली गगनभरारी

एका वर्षात सुमारे पंचवीस लाख रुपयांचा यशस्वी व्यवसाय केला.
Inspiring Success Story of pratiksha tushar patil pranav gruh udyog 25 lakh turnover
Inspiring Success Story of pratiksha tushar patil pranav gruh udyog 25 lakh turnoverSakal

पूर्णा : तालुक्यातील धनगर टाकळी येथील प्रतीक्षा तुषार पाटील यांनी नोकरीच्या शोधात वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या हातात असलेल्या कौशल्याचा उपयोग करून घेत प्रणव गृह उद्योग सुरू केला. एका वर्षात सुमारे पंचवीस लाख रुपयांचा यशस्वी व्यवसाय केला.

विशेष म्हणजे खर्च वजा जाता सात लाख रुपयांचा नफाही मिळाला आहे. प्रतीक्षा यांच्या या कर्तव्याची भरारीचे धनगर टाकळीत कौतुक होत आहे. धनगर टाकळी (ता.पूर्णा) येथील युवक तुषार भगवान पाटील यांच्यासोबत पालम येथील प्रतीक्षा देशपांडे या तरुणीचा २०१६ मधे विवाह झाला.

तिचे शिक्षण बीए. बी. एड. झालेले आहे. पाच वर्षे नोकरीचा शोध घेतला, पण नोकर भरती बंदीमुळे अपेक्षित यश मिळत नव्हते. निरुद्योगी राहणे प्रतीक्षाला अस्वस्थ करत होते. काही तरी करावे हा विचार तिला खुणावत होता.

ती उत्तम लोणचे बनवित असे. तिच्या लोणच्याच्या चवीचे घरी आलेले नातेवाईक कौतुक करत असत. अन् एक दिवस तिने मनाशी खूणगाठ बांधली व आपल्या हाताच्या कौशल्याचा उपयोग करून घेण्याचे ठरवले व आंबा,

आवळा, लिंबू, ओली हळद, मिरची आदी लोणचे बनवून विकण्यास सुरुवात केली. तिच्या या ‘टाकळकर गृह उद्योगा’च्या प्रयत्नास भरघोस यश मिळाले. त्यातून तिच्याजवळ एक लाख रुपये जमा झाले.

थोडे भांडवल जमा झाल्यावर तिने पती तुषार, सासरे भगवानराव, सासू लिलाताई व डॉ. हरिभाऊ पाटील यांच्यासोबत व्यवसाय वृद्धीबाबत चर्चा केली. त्यासाठी त्यांनी तिचे कौतुक करत पाठिशी खंबीर उभे राहण्याची भूमिका घेतली अन् जन्माला आला ‘प्रणव एग्रो फूड गृहउद्योग’.

प्रतीक्षाने थेट तेलंगणा राज्यात जाऊन उत्तम दर्जाची मिरची खरेदी करत तेथील शेतकऱ्यांसोबत करार केला. परभणी, हिंगोली जिल्हातील हळद उत्पादक शेतकरी यांच्या सोबतही करार केला. पावडर बनविण्यासाठी मशिनरी खरेदी केली.

पॅकिंगचे साहित्य खरेदी केले. बाजारपेठेचा अभ्यास करून राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी भागांत विक्रेते नेमले. धूमधडाक्यात उत्पादन सुरू केले. दर्जा असल्याने बाजारपेठेत मागणी वाढली अन त्यांचा हुरुपही वाढला.

आपण दर्जा व गुणवत्ता यात तडजोड केली नाही व करायची पण नाही हे धोरण स्वीकारले. त्यामुळेच यशाचा मार्ग प्रशस्त होतो आहे. सरळ शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांनाही दोन पैसे जास्त मिळत आहेत. अवघ्या एका वर्षात २५ लक्ष नोकरीत वेळ वाया न घालता ‘प्रतीक्षा’चे व्यवसायात मोठे उड्डाण रुपयांचा व्यवसाय करुन त्यांनी खर्च जाता सुमारे सात लक्ष रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

त्यांनी पूर्णा येथील आपल्या राहत्या घरीच हा गृहउद्योग सुरु केला. भविष्यात विविध प्रकारचे मसाले, डिहायड्रेड व्हिजीटेबल,वेगवेगळे पापड आदी बनविण्यासाठी आपण सज्ज होत असल्याचे प्रतीक्षा यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

या उत्कृष्ट कामगिरीची व धडपडीची दखल छत्रपती संभाजीनगर येथे उद्यम इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने प्रोत्साहित करण्यासाठी ‘उद्यम सह्याद्री’ पुरस्काराने प्रणव एग्रो फुड प्रोडक्ट्सला सन्मानित करण्यात आले.

मोहिनी केळकर, एन. एन. इस्टोलकर, सुनीता राठी, उल्हास भाले, दीपा भाले, तुषार जहागीरदार यांनी कौतुक करत पुरस्कार प्रदान केला. प्रयोगशील शेतकरी व शेतीसेवा ग्रुपचे प्रताप काळे व अमृतराज कदम यांनीही कौतुक करत ग्रामीण तरुणाईने हा आदर्श घेत शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले. एकंदरीत प्रतीक्षा पाटील हिने इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करून दाखवू शकतो याचा मापदंड तरुणाई समोर उभा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com