केज : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरणानंतर खून करून मारेकरी वाहनातून पसार झाल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मस्साजोग ग्रामस्थांनी रात्री उशीरा केज-मांजरसुंबा येथे उशीरापर्यंत चक्का जाम आंदोलन केले होते..अज्ञात मारेकऱ्यांना अटक करा व तपास कामात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सकाळी दहा वाजेपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन सुरू होते. या आंदोलनास मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भेट दिली. यासह देशमुख कुटुंबियांचे सांत्वनही केले..मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती समजताच तणावपूर्ण वातावरण बनले होते. याप्रकरणी एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी वापरलेले वाहन सोमवारी रात्री धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात पकडण्यात आले. परंतू अंधारात आरोपी पळून गेले. पोलीस त्यांच्या शोधात आहेत. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ केज शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते..मंगळवारी आठवडी बाजार असूनही बाजारात भाजीपाला व औषधी दुकाने वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी दहा वाजेपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. दिवसभर नागरिक उन्हात बसलेले होते. दुपारी संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयाचा नामफलक फोडला, चौकात लावलेले पक्षाचे बॅनर फाडून व राज्य परिवहन महामंडळाची एक बस पेटवून दिल्याची घटना घडली..यादरम्यान शहरातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर चारही बाजूने दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी एकही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही व तपास कामात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केले जात नाही..तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या पवित्रा घेतला आहे. त्यानंतर या प्रकरणातील सातपैकी दोघांना अटक करण्यात आले असून इतरांनाही लवकरच ताब्यात घेतले जाणार आल्याचे पोलीसांनी सांगितले. मात्र, आपल्या मागण्यांवर संतप्त आंदोलक ठाम असल्याने रात्री उशीरापर्यंत आंदोलन सुरूच होते. त्यामुळे मृतदेहाची उत्तरीय तपासणीही करण्यात आली नव्हती..Jalna Crime : छेडछाड, धमक्यांमुळे मुलीने संपवले जीवन; अंबडला तरुणासह चौघांवर गुन्हा.फरारींच्या शोधासाठी सहा पथकेदेशमुख खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य सुत्रधार सुदर्शन घुले याच्यासह चौघे फरार आहेत. फरारी आरोपींचा सहा पथके शोध घेत आहेत. केज पोलिसांच्या भूमिकेवरील संशयामुळे आता या प्रकरणाचा तपास केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी कमलेश मिना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींना केज ऐवजी बीडला ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रजेवर असलेले पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ मंगळवारी दुपारनंतर जिल्ह्यात परतले. त्यांनी मस्साजोगला भेट देऊन मनोज जरांगे यांच्यासह आंदोलक, नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक कमेलश मिना सोबत होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.