झेडपीच्या कारभारीपदासाठी अंतर्गत डावपेच ! 

file photo
file photo

नांदेड :  जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्षासह विषय समितीत्यांच्या सभापतींचा कार्यकाळ संपल्याने शासनस्तरावरुन निवडणूक पुढील आदेशा पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सुटल्याने दावेदरांनी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यातच राज्यस्तरावरील महाविकास आघाडीच्या समिकरणाचा कित्ता जिल्हा परिषदेत गिरवला जाणार असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये कारभारीपदासाठी अंतर्गत डावपेच सुरु झाले आहेत. जिल्हापरिषदेत महिलाराज असल्याने उपाध्यक्षपदा ऐवजी वजनदार विषय समितीचा कासरा कारभारणीच्या हतात देण्याच्या नवा  प्रयोग साध्य करण्यासाठी डावपेच आखले जात आहेत.


 जिल्हापरिषदेत बहूमताच्या जवळपास पोहचलेल्या कॉग्रेसने आघाडी धर्म पाळत उपाध्यक्ष व दोन विषय समित्यांच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हाती दिल्या.  आडिच वर्ष अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी शासनाने १२० दिवसाची मुदतीसाठी पुढे ढकलली होती. त्यानंर नोव्हेंबर (ता.१९) रोजी राज्यस्तरावरुन अध्यक्षपदासाठी जाहिर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव सुटले आहे. राज्यस्तरावर महाविकास आघाडीच्या फार्म्यूल्या नुसार जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी कॉग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या सत्तेमध्ये आता शिवसेनेलाही वाटा द्यावा लागणार आहे. 

राष्ट्रवादी- शिवसेना सेम टू सेम 
विधानसभा निवडणूकांपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाप्पुसाहेब गोरठेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने एकून दहा पैकी राष्ट्रवादीचे चार ने संख्याबळ कमी झाले. आडिच वर्षे भाजप (१३) सदस्यांच्या सुरात सुर मिळवणाऱ्या शिवसेनेचीही अवस्था राष्ट्रवादीप्रमाणेच आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या चार सदस्यांमुळे शिवसेनेच्या एकून दहा पैकी चार ने संख्यबळ घटणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदिप नाईक यांच्या गटाचे पाच, माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांचा एक असे सहाचे संख्याबळ कायम आहे. शिवसेनच्या प्रवेशामुळे आगामी काळात उपाध्यक्ष पदासह दोन विषय समित्यांचा कारभार हती ठेवण्यात राष्ट्रवादीला कितपत यश मिळते हे येणारा काळ स्पष्ठ करणार आहे. 

डावपेचाचे फासे पलटणार 
एक अंकी संख्याबळावर असलेल्या राष्ट्रवादीला आडीच वर्षात मिळालेल्या सत्तेच्या चाव्या राखून ठेवण्याचे आव्हान असताना कारभारणींच्या हातात दोन विषय समित्यांचा कारभार सोपवण्यासाठी अंतर्गत डावपेच आखले जात आहेत. महाआघाडीच्या प्रयोगामुळे उपाध्यक्ष पद आणि  एका विषय समितीवर राष्ट्रवादीला ‘समाधान’ मानावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत असताना कारभारणीकडे विषय समित्यांचा कारभार सोपविण्यासाठी श्रीं ची लॉबींग सुरु आहे. दरम्यान शिवसेनेला सत्तेत वाटा देताना कॉग्रेस आडीच वर्षातील आपल्याकडील पदांचा आकडा राखून राष्ट्रवादीकडील पदांची आकडे मोड करणार असल्याने अंतर्गत डावपेचाचे फासे राष्ट्रवादीवर पलटण्याची शक्यता जानकारांतून व्यक्त केली जात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com