International Nurses Day: अनाथ रूपाली बनली कोरोना रुग्णांसाठी आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rupali

International Nurses Day: अनाथ रूपाली बनली कोरोना रुग्णांसाठी आधार

औरंगाबाद: घरातील प्रतिकूल परिस्थितीमुळे आई-वडिलांनी बालवयातच तिला भगवानबाबा बालिकाश्रमात आणून सोडले. तेथे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण पुण्यात घेऊन २०१६ मध्ये नर्सिंगचा कोर्स तिने पूर्ण केला. त्यानंतर रुग्णांची अविरत सेवा सुरू केली. मागील वर्षी कोरोनाच्या भीतीने सर्व मैत्रिणी गावी गेल्या. मात्र, कोरोनाची भीती न बाळगता तिने कोविड रुग्णांची सेवा सुरूच ठेवली. जागतिक परिचारिका दिनानिमित्त (International Nurses Day) रूपाली किशन मोकाशे हिचे कार्यकर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे.

मूळची कन्नडमधील करंजखेड गावातील रूपाली किशन मोकाशे. आई -वडिलांनी तिचे कसेबसे सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले; पण घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची तर वडील अपंग, आई शेतीत मोलमजुरी करणारे. यामुळे तिला पुढे शिकवणे शक्य नव्हते. रूपालीच्या बहिणीलाही शिक्षण अर्धवट सोडावे लागले; पण रूपाली शाळेत हुशार असल्याने आई-वडिलांनी तिला औरंगाबादमध्ये भगवानबाबा बालिकाश्रमात आणले. त्यावेळी रूपालीचे वय अवघे ११ वर्षे होते. बालिकाश्रमात आल्यावर तिला आई-वडिलांपासून दुरावल्याचे दु:ख झाले; पण आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांनी रूपालीचे गुण ओळखून तिला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

हेही वाचा: चांगली बातमी! औरंगाबादेत नवीन रुग्णांपेक्षा कोरोमुक्तांची संख्या जास्त

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर रूपालीने नर्सिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर पुणे येथे एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी सुरू केली. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथ आल्याने तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी कोरोनाच्या भीतीने नोकरी सोडून आपापल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रूपालीने नोकरी न सोडता कोविड रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. मागील एक वर्षापासून रूपाली पुण्यामध्ये कोविड रुग्णांची अविरत सेवा करीत आहे. कविता वाघ यांनी केलेल्या संस्कारामुळे इथपर्यंत पोचल्याचे ती सांगते. मागील पाच वर्षांपासून नर्सच्या माध्यमातून ती रुग्णसेवा करत आहे. कोरोनाच्या रुग्णांची सेवा करताना सुरक्षितता पाळल्यामुळे आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झाली नसल्याचे रूपालीने सांगितले.

हेही वाचा: रुग्ण तडफडताहेत, 'पीएम केअर्स'चे व्हेंटीलेर्स नादुरुस्तच

संस्कार अन् सेवेचे व्रत
मागील वर्षी कोरोना संसर्ग त्यात लॉकडाउन यामुळे सुरुवातीला भीती वाटली. त्यात रुग्णांची सेवा करण्याअगोदर मैत्रिणींनी जॉब सोडून गावी जाण्याचा घेतलेला निर्णय यामुळे एकटी पडली होती. कोरोना रुग्णांसोबत आपण भेदभाव केला तर नर्स म्हणून आपल्या सेवेच्या प्रती केलेला अपमान होईल. तसेच बालिका आश्रमात घडवलेले संस्काराचे चीज करण्यासाठी मी पुण्यात राहून कोविड रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपर्यंत रुग्णांची सेवा करीत आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये नोकरी करत बॅंगलोर युनिव्हर्सिटीअंतर्गत जेएनएमचा कोर्स देखील करत असल्याचे रूपालीने सांगितले.

Web Title: International Nurses Day Special Article In Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :International Nurses Day
go to top