Vasmat Theft
sakal
हिंगोली - वसमत शहरात वडिलांच्या ऑपरेशनसाठी बँकेतून काढलेली दहा लाख रुपयांची रोकड कारची काच फोडून लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना त्यांच्या मूळ गावावरून शनिवारी ता. 20 अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.