वासराशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याचा शोध सुरू : नांदेडात गुन्हा दाखल

file photo
file photo

मुदखेड (जिल्हा नांदेड) : शेंबोली (ता. मुदखेड) इथे तीन वर्षाच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली. या प्रकरणी बारड (ता. मुदखेड) पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

शेंबोली (ता. मुदखेड) येथील नरेन देशमुख यांच्या शेतातील आखाड्यावर असलेल्या तीन महिण्याच्या वासरावर आरोपी शेख नबी साहब (वय २४) रा. शेंबोली याने शनिवारी (ता.१८) जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास शेतातील आखाड्यावर कोणी नसल्याचे पाहुन वासरासोबत अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी शेतातील सालगडी पापन्ना नारायण गोरेवाड याने हा घृणास्पद प्रकार पाहिला. यावेळी शख नबी हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. हा प्रकार सालगड्याने आपला मालक नरेन देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. 

शेख नबी साहबचे  अनैसर्गिक कृत्य

घटनेचे गांभीर्य ओळखून शेत मालकाच्या सांगण्यावरून पापन्ना गोरेवाड यांनी बारड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन शेख नबी साहब विरूद्ध अनैसर्गिक कृत्य व सहकलम अकरा प्रमाणे प्राण्यास निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 
तपास पोलिस निरीक्षक नितिन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. मोरखंडे,सहाय्यक फौजदार श्री. सावंत व श्री. कीडे करत आहेत.

अवैध सागवान जप्त


किनवट : गोंकुदा रोडवर संशयित आॅटोचा पाठलाग करून तपासणी केली असता त्यामध्ये एकूण सागी कट साईज २७ नग, ०.१४१० घनमीटर माल (किंमत ८७८२ रुपये) व ऑटो (किंमत ३० हजार) असा एकूण ३८ हजार ७८२ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (ता. २०) करण्यात आली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी के. एन. खंदारे, वनपाल श्री. सांगळे, के. जी. गायकवाड, श्री. सोनकांबळे, वनरक्षक संभाजी घोरबांड, श्री. डोईफोडे, वाहनचालक बी. व्ही. आवले, बी. टी. भुतनर, वनमजूर श्री. जाधव यांचा सहभाग होता.
------ 

कुंटणखानाप्रकरणी आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

वसमत : हट्टा (जि. हिंगोली) पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा बाजार येथील एका टेकडीवर कुंटणखाना चालविणाऱ्या आठ महिलांसह एका पुरुषावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्‍यांना सोमवारी (ता. २०) वसमत न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील अठरा पीडित महिलांना नांदेड येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा बाजार येथील सतरा मेल नावाच्या टेकडीवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती वसमत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश देखमुख यांना मिळाली. त्‍यानुसार शनिवारी (ता. १८) त्‍यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके तसेच हट्टा येथील ठाणेदार यांच्या पथकाने चार घरांत छापा टाकला. या वेळी कुंटणखाना चालविणाऱ्या आठ महिला, एक पुरुष व आठरा पीडित महिलांना ताब्यात घेतले होते. त्‍यांच्यावर रविवारी (ता. १९) हट्टा पोलिसात गुन्हे दाखल झाले.

आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


मंगळवारी त्‍यांना वसमत येथील न्यायालयात हजर केले असतना न्यायालयाने आठ महिला व एक पुरुष अशा नऊ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच पीडित अठरा महिलांना नांदेड येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याची माहिती वसमत पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक उदय खंडेराय हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com