Ayodhya Ram Mandir : केज तालुक्यातील महादेव महाराज बोराडेंना अयोध्येचे निमंत्रण ; श्रीरामांच्या जयघोषात सत्कार करुन दिला निरोप

जगद्गुरू संत तुकोबाराय पावन धाम येथील महादेव महाराज बोराडे यांना अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. गुरुवारी (ता.१८) ते अयोध्येसाठी रवाना झाले. यानिमित्त त्यांचा सत्कार अरुण काळे परिवारातर्फे करण्यात आला.
beed
beedsakal
Updated on

अंबाजोगाई, ता.१९ (बातमीदार)ः जगद्गुरू संत तुकोबाराय पावन धाम येथील महादेव महाराज बोराडे यांना अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. गुरुवारी (ता.१८) ते अयोध्येसाठी रवाना झाले. यानिमित्त त्यांचा सत्कार अरुण काळे परिवारातर्फे करण्यात आला.

केज तालुक्यातील औरंगपूर येथील जगद्गुरू संत तुकोबाराय पावनधामचे प्रमुख महादेव महाराज बोराडे यांना अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे सचीव चंपत राय यांचे हे पत्र बोराडे महाराज व विठ्ठल महाराज चौरे पंढरपूरकर यांना प्राप्त झाले आहे. गुरुवारी यासाठी ते अंबाजोगाई येथून अयोध्येला रवाना झाले.

beed
Ayodhya Ram Mandir : मन राम रंगी रंगले : प्रभू रामचंद्रांचे आदर्श बंधुत्व प्रत्येकाने स्वीकारावे

यानिमित्त महाराजांना निरोप देण्यापूर्वी बीड जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष अरुण काळे यांच्या निवासस्थानी मित्र परिवारातर्फे महादेव महाराज बोराडे व विठ्ठल महाराज चौरे पंढरपूरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर धर्मपात्रे, भारत पतंगे, नारायण मुंडे, ॲड. संतोष पवार, राजू चोकडा, कल्याण काळे, अजिंक्य काळे, दत्ता कदम, मारुती कदम आदींची उपस्थिती होती. जय, जय श्रीरामाच्या जयघोषात महाराजांना अयोध्येकडे प्रयाण करण्यास निरोप देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Swami Govind Devgiri Maharaj seeks Mauli’s blessings in Alandi
Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting
ayodhya ram mandir julan utsav
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Marathi News Esakal
www.esakal.com