जालना : आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोन बुकींसह सट्टेबाजी करणाऱ्या दोन जणांना फिल्डिंग लावून स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता.२६) कॅच करत आऊट केले. या चारही जणांवर भारतीय जुगार कायद्यान्वये सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला..आयपीएल हंगाम सुरू झाल्याने शहरासह जिल्ह्यात सट्टेबाजीला सुरवात होते. यासंदर्भात ता.२२ मार्च रोजी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ता.२४ रोजी आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. त्यामुळे पोलिस सट्टेबाजांसह बुकींच्या शोधात होते. बुधवारी (ता.२६) कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान सट्टा लावणाऱ्या एका व्यक्तीची स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली..त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने बसस्थानक परिसरातील हॉटेल छत्रपती पॅलेस येथून रोहित शंकर क्षीरसागर (वय ३१, रा. मोदीखाना, जालना) यास हॉटेलबाहेर बोलावून घेतले. त्याची झडती घेतली असताना सामन्यावर मोबाइलद्वारे सट्टा लावल्याचे निष्पन्न झाले..पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केला असून बुकी रोहित गोरक्षक (रा.जालना) यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याच ठिकाणी धवल किरीटकुमार शाह (वय ३१, रा. सकलेचानगर, जालना) हा देखील सट्टा लावताना आढळला. याप्रकरणी बुकी चालक शुभम मुदीराज (रा. जालना) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दोन मोबाइल, रोख ४० हजार ५० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला..ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, फुलंचदन गव्हाणे, सुधीर वाघमारे यांनी केली..लाखो रुपयांना चुनामागील तीन दिवसांमध्ये धवल व रोहित हे दोघे आयपीएलच्या सट्ट्यात लाखो रुपये हरले. मात्र, पोलिस रेकॉर्डवर ही रक्कम आलेली नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलच्या ऑनलाइन ट्रांझॅक्शनद्वारे आयपीएल सट्ट्यात किती रक्कम गेली हे स्पष्ट होईल. दरम्यान, पोलिसांनी सट्टेबाजीप्रकरणी २०२८ पासूनचे रेकॉर्ड तपासत आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या १६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली..Chh. Sambhajinagar : सासरे जज, पती वकील! बघून घेईन सावकार महिलेच्या कर्जदार, सहकार अधिकाऱ्यांना धमकी.‘त्या’ बुकींकडून मिळू शकते माहितीआयपीएल सट्टा घेणारे दोन बुकी या गुन्ह्यात समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मोबाइलचे कॉल, बॅक ट्रांझॅक्शनची पोलिसांनी चौकशी केली तर मागील पाच दिवसांमध्ये किती जणांनी आयपीएल मॅच दरम्यान त्यांच्याकडे सट्टा लावला, याची माहिती पुढे येऊ शकते. शिवाय गुन्हा दाखल झालेल्या सट्टेबाजांच्या कॉल हिस्ट्रीवरून इतर बुकींची माहिती पोलिसांना मिळू शकते. मात्र, हा तांत्रिक तपास पोलिस करणार का, हे पाहावे लागणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.