
आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या चौघांवर बुधवारी (ता. १४) गुन्हा दाखल झाला आहे. यात पोलिसांनी एक कार, मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील एका जीनींगच्या मोकळ्या मैदानावर एका कारमध्ये बसलेले चौघे जण आयपीएलवर सट्टा घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक किशोर पोटे, सहाय्यक निरिक्षक शिवसांब घेवारे, बालाजी बोके, विलास सोनवणे, विठ्ठल कोळेकर, सुनील अंभोरे, राजूसिंह ठाकूर, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत यांच्या पथकाने मंगळवारी (ता. १३) रात्री एका कारवर कारवाई केली. यावेळी कारमध्ये बसलेले पवन आळणे, किशन कोकाटे, अनिल पवार, विट्ठल पतंगे सर्व रा. आखाडा बाळापूर हे मुंबई इंडियन्स विरुध्द कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यावर सट्टा घेत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल एक कार असा सात लाख ८६ हजाराचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान, चौघेजण सट्टा घेत असल्याने त्यांच्या मोबाईलवर कोण सट्टा लावत होते. याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे. त्यासाठी या चौघांच्या मोबाईलवर त्या वेळेत कोणाचे कॉल आले होते. किती वेळेस आले होते याचे सीडीआर काढून त्यानुसार त्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे पोलिसानी सांगितले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.