
नांदेड : भारतीय रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग पोर्टल आयआरसीटीसीचे सर्व्हर सोमवारी सकाळी काही वेळासाठी डाउन झाले होते. ऑनलाइन बुकिंग बंद असल्याने प्रवाशांनी काउंटरवर तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर ‘मेंटेनन्स’ असा संदेश दिसून येत असल्याने बुकिंग, रद्दीकरण आणि तत्काळ तिकीट काढणे बंद झाले होते.