Isapur Right Canal Irrigation: ‘इसापूर’च्या उजव्या कालव्यातून १ नोव्हेंबरपासून आवर्तन, हंगामांत प्रत्येकी २ आवर्तने; १ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

Rabi Summer Water Schedule : इसापूर उजव्या कालव्यातून १ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामातील पहिली पाणीपाळी सुरू होणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामांत प्रत्येकी दोन पाणीपाळ्यांचे नियोजन असून, जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
Isapur Right Canal irrigation is scheduled to begin on November 1 for the 2026–27 rabi season.

Isapur Right Canal irrigation is scheduled to begin on November 1 for the 2026–27 rabi season.

esakal

Updated on: 

नांदेड : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजव्या कालव्याद्वारे २०२६-२७ या वर्षातील रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्राथमिक सिंचन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही हंगामांत प्रत्येकी दोन पाणीपाळ्या सोडण्यात येणार असून, रब्बी हंगामातील पहिली पाणीपाळी एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सिंचनामुळे जिल्ह्यातील जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी इसापूर धरणातील पाणीसाठा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पाणीपाळ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com