सलून दुकाने बंद असल्याने उपासमार, ग्राहकांनाही वाढलेल्या केसाची चिंता

प्रकाश काळे
Saturday, 4 April 2020

मागील महिन्यापासून देशभरात कोरोनाची साथ सुरू झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी समाजाकडे दुकान सोडून दुसरे साधन नाही. पंधरा दिवसांपासून नाभिक समाज आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.

किल्लेधारूर (जि. बीड) - कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केशकर्तनालय बंद ठेवल्यामुळे लहान-मोठे दुकानदार व कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी समाजाकडे दुकान सोडून दुसरे साधन नाही. पंधरा दिवसांपासून नाभिक समाज आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. मागील महिन्यापासून देशभरात कोरोनाची साथ सुरू झाली. सामाजिक अंतर व गर्दी टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. सलूनची दुकानेही बंद आहेत. हे कारागीर दररोज सेवा देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात.

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या!

पंधरा दिवसांपासून दुकाने बंद असल्यामुळे ते घरामध्ये बसून आहेत. त्यांना इतर दुसरे कामही नाही. त्यामुळे कारागिरांवर आर्थिक संकट कोसळले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह व तसेच रोजचा खर्च भागवावा कसा, असा प्रश्‍न पडला आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या कोणी आर्थिक मदतही करायला तयार नाही. यामुळे हे लॉकडाऊन आणखी पुढे चालू राहिल्यास कारागिरांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. शासनाने लहान व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. 

आम्ही लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत गृहीत धरला होता; परंतु पुढील कालावधी वाढल्यामुळे समाजावर मोठे संकट कोसळले आहे. पुढील दिवस कसे काढावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आम्हाला वेळीच मदत करण्याची गरज आहे. 
- परमेश्वर राऊत, अध्यक्ष, नाभिक समाज, किल्लेधारूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is time for the shopkeeper to starve.