

Drought conditions and rainfall shortage have severely affected cotton crops in rainfed areas of Jafrabad taluka.
esakal
जाफराबाद : ‘‘शेतात बियाणं नव्हे, कुटुंबाची स्वप्नं पेरली; पण दुष्काळाने या स्वप्नांचाच पाचोळा होताना डोळ्यांदेखत पाहतोय. सायेब, तुम्हीच सांगा यातून कसं सावरायचं?’’ अशी व्यथा पापळ येथील शेतकरी सदू धारे यांनी व्यक्त केली.
गतवर्षी पाण्याच्या अपेक्षेने ६० फूट खोल विहीर खोदली. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न आणि घराचे बांधकाम अशी स्वप्ने उराशी बाळगून शेती बागायती करण्यासाठी खोदलेल्या विहिरीला मात्र अपेक्षित पाणी लागले नाही.