

Jalna News
esakal
जालना: शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने सोमवारी (ता. ३०) हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. शहरात रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरूच होता. अंबड तालुक्यातील महाकाळा येथील दोन तरुणांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला.