Jalgaon News: जळकोटमधील अर्धवट रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा; पत्रकार भवन व बाजार समितीसमोरील रस्त्यावर लोखंडी सळ्या उघड्या
Incomplete Road in Jalgaon Poses Serious Accident Risk: जळकोटमधील पत्रकार भवन व बाजार समितीसमोरील मुख्य रस्ता वर्षभर कामामुळे अर्धवट आहे. उघडी लोखंडी सळ्या आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जळकोट: शहरातील पत्रकार भवन आणि बाजार समितीसमोरील मुख्य रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या जीवघेण्या खड्ड्यात लोखंडी सळ्या उघड्या सोडल्याने हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.